sambhajiraje Chhatrapati call bank officer

मला एक सांगा, मी आता कुंभारवाडीत आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसलोय. अस नाही, कुंभारवाडीत आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, तुम्ही त्यांना कर्ज देत नाही. ही अडचण आहे. ती अडचण आहे. अस उडवा उडवीची उत्तर देता. सीबील खराब आहे म्हणता.

बीड : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) बीडमध्ये नुकसानग्रस्त शेतीची (Farmer) पाहणी करण्यास गेले आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Huge Loss Of Famers) झाले आहे. संभाजीराजे छत्रपती हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बँक अधिकाऱ्यांना सुनावले आहे. कुंभारवाडीतल ग्रामस्थांना कर्ज देण्यावरुन टोलवाटोलवी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना संभाजीराजेंनी फोनवरुन चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी बँकेतील अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट फोन केला. यावेळी त्यांनी बँक अधिाकऱ्याशी संभाषणात म्हटले की,
मला एक सांगा, मी आता कुंभारवाडीत आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसलोय. अस नाही, कुंभारवाडीत आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, तुम्ही त्यांना कर्ज देत नाही. ही अडचण आहे. ती अडचण आहे. अस उडवा उडवीची उत्तर देता. सीबील खराब आहे म्हणता.

बँक अधिकारी : शंभरातील काही जणांचे असेल

संभाजीराजे : नाही नाही.. इथे सगळ्यांची तक्रार आहे, मी खोटं बोलत नाहीये, मी इथे समोर आहे. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, कुंभारवाडीतील लोकांना परत पाठवतो तुमच्याकडे
(गावकऱ्यांचा आवाज – २२गावं आहेत) त्यांच्याकडून जर व्यवस्थित रिपोर्ट आला नाही, तर मी स्वतः बँकेत येऊन बसणार

बँक अधिकारी : तुम्ही येण्याची आवश्यकता नाही

संभाजीराजे : शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि तो अडचणीत आहे सध्या. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, तुमच्या अडचणी काय आहेत ते सांगा, पण उडवून लावू नका.

बँक अधिकारी : सरपंच येतात त्यांना सांगतो

संभाजीराजे : ठराविक लोकांना पाठवतो आणि त्याचा रिपोर्ट मला डायरेक्ट यायला पाहिजे. सिबील वगैरे गेलं खड्ड्यात, ते काय करायचं आपण.. अशावेळी तुमचे अधिकार वापरा ना जरासे. त्यांनी त्यांच्या व्यथा- दुःख मला सांगितलं. मार्ग काढा, मार्ग नाही निघाला तर मला सांगा, पण रिपोर्टिंग करा मला आज

अशाप्रकरचे संभाषण संभाजीराजे छत्रपती आणि बँक अधिकारी यांच्यामध्य़े झाला आहे. तसेच माध्यमांशी संवाद साधतान संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, ही वेळ मदत करण्याची आहे. एकमेकांवर ताशेरे ओढण्याची नाही. असे सल्ला त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना दिला. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर पुढारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करताना दिसत आहेत असेही ते म्हणाले आहेत.

तसेच देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रदान मोदींसोबत घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची मदतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच राज्यात चाललेल्या राजकारण्यांवर बोलण्यास संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.