बीडमधील धक्कादायक घटना; राक्षसभुवनमध्ये दोन सख्या बहिणींचा गोदापात्रात बुडून मृत्यू

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा, गोदावरी नदीत बुडून मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे 12:30 दरम्यान घडली आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    बीड : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा, गोदावरी नदीत बुडून मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे 12:30 दरम्यान घडली आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेहा धर्मराज कोरडे वय 9 वर्ष व अमृता धर्मराज कोरडे वय 8 वर्ष असे, मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलींची नावे आहेत.

    तर घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

    दरम्यान गेवराई तालुक्यात यापुर्वी देखील मिरगाव, संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहे. त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.