Maratha youth's suicide note forged, shocking revelation in suicide case

बीड (Beed) जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास (Suicide ) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे.

बीड : उच्च न्यायालयाने (SC) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) राज्यात स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून ठाकरे सरकारकडून स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र सुरू झालं आहे. बीड (Beed) जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास (Suicide ) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे. १८ वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवेकने नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल असावं, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.

चिठ्ठीत काय लिहिलं आहे

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…

पार्थ पवार यांनी ट्विट करत विवेकच्या आत्महत्येवरुन रोष व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे, असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.