बीडच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; चक्क 22 तास मृतदेह कोरोना ग्रस्त रुग्णाच्या शेजारीचं…

    बीड : बीडच्या जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कोविड वॉर्ड मध्येच तसाच रेप करून ठेवण्यात आला. जवळपास वीस तास हा मृतदेह इथेच ठेवला असल्याचा या ठिकाणचे रुग्ण सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेल मधील कोविड वार्डमधील हा सर्व प्रकार आहे. हा मृतदेह याठिकाणी ठेवण्यात आल्याने वार्डमधील रुग्ण देखील भयभीत झाले होते. तब्बल वीस तासानंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेर काढलाय. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, मात्र हा सर्व प्रकार समोर आल्याने आता संताप व्यक्त केला जातोय.

    दरम्यान, बीडमध्य बनावट रेमडेसिवि इंजेक्शनचा प्रकार कालच उघडकीस आला असतांना, आता बोगस एचआरसीटी स्कोअर देत असल्याचा प्रकार देखील समोर आलाय.हा सर्व प्रकार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी समोर आणला असून याविषयीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय.

    जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की डोंगरे नामक महिला या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.त्यांचा जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कोअर तपासला असता ३ स्कोअर दिला होता.त्यांचा शहरातील शिवाजीराव हार्टकेअर सेन्टरमध्ये एक्सरे काढला असता नॉर्मल आला.पुन्हा त्याच शहरातील सिटी सेन्टरमध्ये एचआरसीटी HRCT स्कोअर तपासणी केली असता १० स्कोअर दिला.हा सर्व प्रकार केवळ १ ते २ तासात झालाय, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय