धक्कादायक प्रकार! अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या

  • बीडमध्ये लोखंडी गजाचा वापर करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या
  • अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्रकार प्राथमिक अंदाजातून व्यक्त
  • तसेच या मागचं नक्की कारण काय? हे अद्याप अस्पष्ट

बीड – बीडमध्ये लोखंडी गजाचा वापर करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील लाडेवडगाव या ठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञातांकडून मृत व्यक्तीच्या गुप्तांगावर लोखंडी गजाचा वापर करून हा खून करण्यात आला. त्यानंतर या मृत व्यक्तीला विविस्त्र अवस्थेत शेताच्या बांधावर फेकून हे मारेकरी फरार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी या प्रकरणाची चाचपणी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत व्यक्तीचं नाव बाबासाहेब चंद्रभान लाड असे आहे. मारेकऱ्यांनी लाड यांचा खून करून त्यांना विवस्त्र अवस्थेत एका शेताच्या बांधावर फेकून दिले. परंतु पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असता, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्रकार प्राथमिक अंदाजातून व्यक्त केला आहे.   

दरम्यान, लाड यांच्यावर हा हल्ला कोणी केली, कशासाठी केला, तसेच या मागचं नक्की कारण काय? हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहे.