…म्हणून राज्य सरकारने ई डब्लू एस आरक्षण आदेश काढला : विनायक मेटे

शिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला त्यांचे आभार मात्र या बरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भात देखील राज्यसरकार ने तातडीनं निर्णय घ्यावेत. अन्यथा मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रोषाला तयार व्हा, असा इशारा विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला.

    बीड :  शिवसंग्रामने हायकोर्टात याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने दणका दिला, तेव्हा राज्य सरकारने ई डब्लू एस आरक्षण आदेश काढला. सरकारला लाथा घातल्या शिवाय जाग येत नाही. असा घणाघात मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

    दरम्यान उशिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला त्यांचे आभार मात्र या बरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भात देखील राज्यसरकार ने तातडीनं निर्णय घ्यावेत. अन्यथा मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रोषाला तयार व्हा, असा इशारा विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला.