बीडच्या अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एक्कर जमीन विकली…

भाजप नेत्यांच्या ताब्यात असणाऱ्या, बीडच्या अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एक्कर जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी, 25 एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र जमीन विकुणही अद्याप शेतकऱ्यांचे पैशे दिले नाहीत. यामुळे जमीन विक्री केलेले पैसे गेले कुठं ? असा सवाल शेतकरी करत करत आहेत.

    बीड : भाजप नेत्यांच्या ताब्यात असणाऱ्या, बीडच्या अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एक्कर जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी, 25 एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र जमीन विकुणही अद्याप शेतकऱ्यांचे पैशे दिले नाहीत. यामुळे जमीन विक्री केलेले पैसे गेले कुठं ? असा सवाल शेतकरी करत करत आहेत. विशेष म्हणजे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश आडसकर यांच्या ताब्यात हा कारखाना आहे.

    अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने, साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्याच्या कारणाने, 25 एकर जमीन विक्री केली आहे. मागच्या वर्षी या साखर कारखान्यांमध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना, अद्याप एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. विशेष म्हणजे केवळ ऊसापासून साखर बनली, असे नाही तर वेगळे उप पदार्थ सुद्धा बनले. मग तरीही शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत ? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी उपस्थित केला आहे. तसेच कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार संशयास्पद असून यामध्ये आर्थिक गैर व्यवहार झाला आहे, म्हणून हा आदेश मागे घ्या. अशी मागणी केली

    अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला, 7 जून 2021रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी, अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्यास परवानगी दिली होती. शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी.चे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबासाखरने उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. सदरील प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला तातडीने स्थगिती द्यावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

    शेतकऱ्यांना एफ आर पी चे पैसे देण्यासाठी आम्ही पंचवीस एकर जमीन विकली आहे. मात्र यामधून एकही रुपया इकडे तिकडे गेलेला नाही. यातून शेतकऱ्यांच्या उसाची थकीत बिले दिली आहेत. तसेच हा व्यवहार पारदर्शक झाला असून कारखान्यावर प्रशासक नेमल्यानंतर, कारखान्याला कुठल्या बँकेने कर्ज दिले नाही. म्हणून सभासदांच्या ठेवी मधून कारखाना चालू ठेवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे हित व्हावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे भाजपा नेते चेअरमन रमेश आडसकर यांनी सांगितले.

    दरम्यान अनेक वेळा शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून कारखाना हस्तांतर करण्याची कारखाना विकण्याची वेळ अनेकांवर आली ते महाराष्ट्राने पाहिलं. मात्र आता थेट जमिनी विकण्याचा पायंडा पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच कारखाना तोट्यात दाखवून सहकाराचा स्वाहाकार करण्याची नीती राजकीय नेत्यांनी अवलंबित असल्याचा प्रकार देखील समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताचे आणि हक्काचे पैसे परस्पर एखादा राजकीय नेता हडप करत असेल तर त्यावर ती कारवाई व्हावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.