वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा डल्ला; तब्बल ‘इतके’ लाख रुपये जमा केले स्वतःच्या खात्यात

कुटुंबाच्या परस्पर मयत पित्यांची चेकवर बनावाट स्वाक्षरी करून तब्बल ६५ लाख रुपये स्वताच्या खात्यात जमा केले. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून सदरील मुलावर परळी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड : कुटुंबाच्या परस्पर मयत पित्यांची चेकवर बनावाट स्वाक्षरी करून तब्बल ६५ लाख रुपये स्वताच्या खात्यात जमा केले. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून सदरील मुलावर परळी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अब्दुल रहील अब्दुल रौफ वय ३१ राहणार आझादनगर परळी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरोपी मुलाने कुटुंबाला माहिती न देता मयत वडिलांच्या चेकवर त्यांची बनावट स्वाक्षरी करून स्वतःच्या खात्यात तब्बल ६५लाख ९२हजार रुपये जमा केले .
    सदरील बाबा आरोपीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबद मुलास विचारणा केली असता त्यावर आरोपी मुलाने स्वतःच्या आईस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

    दरम्यान या प्रकरणी करमबेग अब्दुल रौफ यांचा फिर्यादिवरून परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत.