उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंकडून खास शुभेच्छा; परळीत 45 फुटांची प्रतिकृती

येत्या 22 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ असते. परळीत देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, एक एक खास फ्लेक्स झळकतो आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी शहरातील मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या टॉवर चौकात, 45 फूट उंच अजित पवारांची प्रतिकृती साकारण्यात आलीय.

    बीड : येत्या 22 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ असते. परळीत देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, एक एक खास फ्लेक्स झळकतो आहे.

    सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी शहरातील मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या टॉवर चौकात, 45 फूट उंच अजित पवारांची प्रतिकृती साकारण्यात आलीय. शहरातील मुख्य ठिकाणी हे फ्लॅक्स झळकणार असून याला उभारण्यास 24 तासांचा अवधी लागतो आहे. खास परभणीहून हे फ्लॅक्स मागवण्यात आले आहेत.

    अजित पवारांच्या वाढदिवसाला दहा दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच लावण्यात येत असलेले हे फ्लेक्स चांगलेच चर्चेत येत आहेत. एकीकडे प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्यानं, पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. तर बीड मधील भाजपचे पदाधिकारी देखील अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील हा उत्साह चर्चेचा विषय ठरतोय.