खते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा; पंकजा मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

    परळी : बीड जिल्हयातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव दराने होत विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून ही लूट त्वरित थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

    सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.

    दरम्यान शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.