बीड जिल्ह्यामध्ये गाजलेल्या मनरेगा घोटाळ्यातील दोषीवर कडक कारवाई केली जाईल; संदिपान भुमरेंचा इशारा

बीड जिल्ह्यात मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो. असा इशारा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत मनरेगा कामाचा आढावा घेतला. तसेच घोटाळ्यासंदर्भात कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

    बीड : बीड जिल्ह्यात मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो. असा इशारा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत मनरेगा कामाचा आढावा घेतला. तसेच घोटाळ्यासंदर्भात कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

    यावेळी पत्रकारांनी बीड चे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गावातील घोटाळया संदर्भात प्रश्न विचारला असता, माझ्याकडे तक्रार आलेली नाही, शासन आम्हीच आहोत. दोषी असेल तर कारवाई होणार मग तो कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होणारच काय घोटाळा आहे, तो पाहू असे उत्तर दिलें.

    बीड जिल्ह्यात मनरेगाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली असून, रोहयोमंत्री यांनी बीड जिल्हा प्रशासनाचे बैठक घेऊन कामा संदर्भात माहिती घेतली. दोषींवर कारवाई केली जाईल असं सूचक वक्तव्य केल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    2011 ते 2019 या आठ नऊ वर्षात बीड जिल्ह्यात रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना जिल्हा अधिकारी न्यायालयाला योग्य माहिती देत नाहीत म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते या नंतर बीड जिल्ह्यात नरेगाच्या घोटाळा हा विषय चर्चेला आला होता न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला जाग आली असून रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत रोहयोच्या कामाची पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांना कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिल्या. तसेच नरेगाच्या रखडलेल्या कामासंदर्भात शेतकर्यांच्या थकित बिले संदर्भात देखील जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.