बीड जिल्ह्यात पुढील १० दिवस कडक लॉकडाऊन

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूच्या आकडा वाढण्याबरोबरच कोरोनाची प्रकरणेही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलले आहेत. सर्व नियम कठोर केले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६ रुग्णांमध्ये तीन महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृत आंबेजोगाई, परळी, आणि केज या तालुक्यातील असल्याचे समजले आहे.

बीड : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मराठवाड्याती बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप होताना दिसत आहे. बीड मध्ये मंगळवारच्या रात्रीपासून १३ तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. १३ तासात ६ जणांचा मृत्यू होण्याची ही पहीलीच घटना आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूच्या आकडा वाढण्याबरोबरच कोरोनाची प्रकरणेही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलले आहेत. सर्व नियम कठोर केले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६ रुग्णांमध्ये तीन महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृत आंबेजोगाई, परळी, आणि केज या तालुक्यातील असल्याचे समजले आहे. 

बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१३९ झाली आहे. तर आतापर्यंत १४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीडमध्ये कोरोन रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हयात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.