बीडच्या जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी…

डमध्ये कोरोनाबाधित महिलेने उपचार घेतले. कोरोनावर विजय मिळवला, घरी गेल्यानंतर आठ दिवसाने पुन्हा त्रास सुरू झाला. पुन्हा जिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेला म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसली. या महिलेवर बीडच्या जिल्हा रूग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

    बीड : बीडमध्ये कोरोनाबाधित महिलेने उपचार घेतले. कोरोनावर विजय मिळवला, घरी गेल्यानंतर आठ दिवसाने पुन्हा त्रास सुरू झाला. पुन्हा जिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेला म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसली. या महिलेवर बीडच्या जिल्हा रूग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

    बीडच्या जिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच म्युकरमायकोसीसची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. अंबाजोगाई स्वाराती रूग्णालयामध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आता बीडच्या जिल्हा रूग्णालयातही होत आहे. वडवणी तालुक्यातील 65 वर्षांची महिला 14 एप्रिल रोजी कोरोनाबाधित आढळल्याने उपचारासाठी लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झाली होती. तिच्यावर 15 दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर ती गावाकडे परतली.

    गेल्या आठवडाराभरापासून तिला पुन्हा त्रास सुरू झाल्याने जिल्हा रुग्णायामध्ये दाखल करण्यात आले. तिचा सिटीस्कॅन करण्यात आला, तेव्हा त्यात म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून आली. तिच्यावर तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी अ‍ॅन्टिजेन टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तरीही शनिवारी दुपारी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्याने बीडच्या रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक घुबेकर, डॉ.आय.बी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुधाकर बीडकर, डॉ.सचिन कोल्हे, डॉ.अभिषेक जाधव, डॉ.मिनाक्षी साळुंके, डॉ.सोमनाथ वाघमारे यांच्या पथकाने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.