कोरोनाची लस घ्या व दाढी,कटींग मोफत करा; कड्यातील युवकाची अनोखी योजना…

लसीकरणास  प्रोत्साहन देण्यासाठी कडा येथील नाभिक समाजातील युवक रवींद्र गायकवाड यांनी अनोखी शक्कल लढवली आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांची दाढी मोफत करण्यात येईल. तसेच दाढी करताना मास्क सॅनिटायझर आणि कोरोना प्रतिबंधक सगळ्या उपायोजना करून ही दाढी  करण्यात येणार आहे. त्यासाठी लसीचे दोन डोस  पूर्ण झालेले ऑनलाईन प्रमाणपत्र व आधार कार्ड हे ग्राहकांनी आणणे बंधनकारक आहे. रवींद्र गायकवाड या युवकाच्या या आनोख्या योजनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू  असून राज्यभरातून या युवकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    बीड : कोरोनाच्या महामारी ने जगात थैमान घातले असताना आजारावर भारतीय बनावटीच्या  कोवीशिल्ड व कोवेक्सिंन या  लसीना मान्यता मिळाली असूनही या बाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे.तसेच या लसीच्या परिनामाबाबत लोक नाना प्रकारच्या नाहक चर्चा करून संभ्रमात आहेत. अशातच या नाहक चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी व लसीकरणास  प्रोत्साहन देण्यासाठी कडा येथील नाभिक समाजातील युवक रवींद्र गायकवाड यांनी अनोखी शक्कल लढवली आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीचे कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांची दाढी मोफत करण्यात येईल.

    सध्या कोरोनाने भारतासह जगात थैमान घातले असून,यावर उपाय म्हणून लस आणि मास्क हे दोनच पर्याय आहेत.परंतु लशीबाबत सध्या ग्रामिण भागात तक्रवितक्र काढले जात असल्याने व जगजागती जास्त नसल्याने लोकांची लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील रविंद्र गायकवाड या तरूणाचा सलूनचा व्यवसाय असून,त्याने जो कुणी व्यक्ती लसणीकरणाला जाईल व लसीचे दोन्हीही डोस घेईल त्याची आपण दाढी मोफत करणार असल्याचे जाहिर केले.दाढी मोफत करणे ही खुप खर्चीक बाब नाही किंवा समोरच्या व्यक्तींनाही खुप मोठा फायदा होईलु असे काहि नाही पण आपल्या या योजनेमुळे जर लसीकरणाचा जोर वाढला तर आपल्याला समाधान मिळेल असे रविंद्रने सांगितले.

    .तसेच दाढी करताना मास्क सॅनिटायझर आणि कोरोना प्रतिबंधक सगळ्या उपायोजना करून ही दाढी  करण्यात येणार आहे. त्यासाठी लसीचे दोन डोस  पूर्ण झालेले ऑनलाईन प्रमाणपत्र व आधार कार्ड हे ग्राहकांनी आणणे बंधनकारक आहे. रवींद्र गायकवाड या युवकाच्या या आनोख्या योजनेची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू  असून राज्यभरातून या युवकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.