अधिकाऱ्यांची मग्रुरी खपवून घेणार नाही; ऊर्जा मंत्र्याचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही. असा सज्जड दम राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बीडच्या अधिकाऱ्यांना भरलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीड मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. तर यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसून आलं.

    बीड : कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र सरकार म्हणून नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केलं आहे. अशातचं एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही. असा सज्जड दम राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बीडच्या अधिकाऱ्यांना भरलाय.

    दरम्यान मराठवाड्यात ऑक्सिजन प्लांट पाहणीसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीड मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. तर यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसून आलं.