बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघांचा जीव वाचला

मिळालेल्या माहितीनुसार, या इंडिका गाडीच्या मालकाचे नाव शिवाजी लोणके असे आहे. शिवाजी लोणके हे त्यांच्या तीन मित्रांसोबत पिंपळनेर येथे गेले होते. त्या ठिकाणाहून काम आटोपून आल्यावर ते खडकी देवळा गावी निघाले होते. मात्र रस्त्यात घाट सावळी गावाजवळ आले असता त्यांच्या गाडीच्या इंजिनमधून धूर निघत होता.

    बीड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी काही क्षणार्धात कार जळून खाक झाली. बीडमधील परळी रोडवरील घाटसावळी येथे ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली.

    दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या इंडिका गाडीच्या मालकाचे नाव शिवाजी लोणके असे आहे. शिवाजी लोणके हे त्यांच्या तीन मित्रांसोबत पिंपळनेर येथे गेले होते. त्या ठिकाणाहून काम आटोपून आल्यावर ते खडकी देवळा गावी निघाले होते. मात्र रस्त्यात घाट सावळी गावाजवळ आले असता त्यांच्या गाडीच्या इंजिनमधून धूर निघत होता.

    ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला

    यावेळी गाडीचा ड्रायवहर महादेव रागडे यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर ते बोनेट उघडण्यासाठी बाहेर गेले असता त्याचवेळी गाडीने पेट घेतला. सुदैवाने गाडीत बसलेले अन्य तिघेजण तात्काळ बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलिस याबाबतचा पुढील तपास करीत आहेत.