मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार; विनायक मेटेंचा इशारा

जोपर्यंत मराठा समाजाला सर्व समाविष्ट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर सुरु ठेवणार आहोत. पोलिसांनी 5 तारखेच्या मोर्चाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी पोलीस मोर्चा अडवतील त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.

    बीड : मराठा आरक्षणासाठी येणाऱ्या 5 तारखेला कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. या सरकारला सळो की पळो करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सर्व समाविष्ट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर सुरु ठेवणार आहोत. पोलिसांनी 5 तारखेच्या मोर्चाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी पोलीस मोर्चा अडवतील त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. तर आरक्षण न मिळाल्यास बीड मधील मोर्चाची ठिणगी राज्यभर वणवा पेटवेल, असा इशारा देखील इशारा मेटे यांनी सरकारला दिला.

    तर माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मोर्चामध्ये मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. दरम्यान मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, बीडमधील हा मोर्चा राज्यातील पहिला मोर्चा असल्याने, याकडं सर्वांचे लक्ष लागून आहे.