बीड जिल्ह्याला केंद्राकडून अपेक्षित लस व ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी माजी पालकमंत्र्यानी ही लक्ष द्यावे; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार

    बीड : बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पावर याना पत्र लिहिले होते आणि या पत्रात त्यांनी म्हटले होते की, “माझ्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. रेमीडिसिव्हीरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे या समस्यांचे उत्तर नाही.”

    दरम्यान पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या होत्या की “बीड जिल्ह्यामध्ये अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या घेऊन रेमीडिसिव्हीर देण्यात आले असे दाखवण्यात आलेले आहे. पण ते रुग्णांनाच काय डॉक्टरांनाही मिळाले नाहीत. दहशतीच्या वातारवणामुळे डॉक्टर्स यावर व्यक्त होत नसले तरी ही मी जबाबदार नागरिक म्हणून आपणास सांगते ही परिस्थिती सत्य आहे.”

    या मुद्यावर पलटवार करत धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यांनी सुद्धा आधीकच लक्ष देणे गरजेचे होते मात्र अगोदरच का लक्ष दिले नाही असे म्हणता येत नाही मात्र त्यांनी दिलेल्या सूचनांवर लक्ष देणे हे आमचे कर्तव्ये आहे,बीड जिल्ह्याच्या जनतेच्या आरोग्याची सेवेची काळजी घेणे गरजेचे आहे मात्र केंद्रात सत्तेत त्या आहेत त्यांना अपेक्षित जाग येणे गरजेचे आहे बीड जिल्ह्यात जास्त लसी मिळाव्यात केंद्र सरकार ठरवते की कोणत्या जिल्ह्याला किती ऑक्सिजन पुरवठा करावा हे त्यांच्या हातात आहे आणि मिळावे यासाठी अपेक्षित लक्ष घालावे अशी माझी अपेक्षा आहे असे धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर पलटवार केला.