आघाडी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे सरकारचे स्वागत; माञ हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना द्यावा : पंकजा मुंडे

अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आज भाजपकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी नेतृत्व केलं. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आलीय.

    बीड :  आघाडी सरकारकडून अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलंय. या घोषणेचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले, परंतु हे पॅकेज दिल्यानंतर ते किती दिवसांमध्ये शेतकऱ्यांना देणार आहात. हे त्यांनी जाहीर करावं आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खातात हा निधी द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, त्या बरोबरच हे पॅकेज वाढवण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केलीय.