बीड जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुप्पटने वाढ

दरोडा, लूटमार, चोऱ्या खुन यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा कमी आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे.

    बीड जिल्ह्यात कोरोना काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुप्पटने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्या महराष्ट्रातील उत्तर प्रदेश बनतोय की काय अशी भिती सामाजीक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

    या संदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी म्हणाले की, “दरोडा, लूटमार, चोऱ्या खुन यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा कमी आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे. मागल वर्षी सात महिन्यात जवळपास 95 गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या वर्षी सात महिन्यात जवळपास 250 गुन्हे दाखल झाले आहेत.

    या गुन्ह्यांमागील कारण सांगताना पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी म्हणाले की, “या गुन्ह्यांचा आम्ही अभ्यास केला असता वाढणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांविषयी आमच्या समोर आलं की, कोरोनामुळं आता सर्व लोक गावाकडे आले आहेत. त्यामुळं घरात वाद होतात आणि त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झालेली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रत्येक उपविभाग स्तरावर पिंक मोबाईलची स्थापना केली आहे. आणि याची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळ महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने होऊ शकतो. अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांनी दिली आहे.