टँकर मालकाचा निष्काळजीपणा भोवला; विजेचा शॉक लागल्याने एका मजुरांचा जागीच मृत्यू

परळी तालुक्यातील धर्मपुरी फाट्याचे समोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर राखेच्या टँकरमधून राख काढणारा कामगार संतोष रतन लोखंडे वय 30 वर्षे रा. बरकत नगर परळी याचा काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यूव झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    परळी : परळी तालुक्यातील धर्मपुरी फाट्याचे समोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर राखेच्या टँकरमधून राख काढणारा कामगार संतोष रतन लोखंडे वय 30 वर्षे रा. बरकत नगर परळी याचा काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यूव झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    मयत संतोष लोखंडे याला टँकर चालक अनिल याने हायगई व निष्काळजीपणाने स्वतः चे टॅकर इलेक्ट्रिक तारेच्या खाली थांबवले व मालक सुशांत वनवे , बाळासाहेब काकडे , अमर काकडे याने मयत याला सदरची तार बंद पडलेली आहे. शॉक लागत नाही .वर जाऊन टँकरचे ढक्कन खोल ,असे म्हणून वर पाठवले. मयत कामगार हा वर चढून टँकर चे ढक्कन खोलत असताना वरील विद्युत तारेला स्पर्श होऊन त्याचा खाली पडून जागीच मृत्यू झाला.

    मयताच्या पत्नीच्या फिर्यादी वरून परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरंनं 208/21 कलम 304 ,34 भा द वि प्रमाणे वरील सर्व आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एस मुंडे यांनी स्टॉपसह भेट दिली. अन्यन्या हॉस्पिटल येथे संतोष लोखंडे याना उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते मात्र संतोष लोखंडे याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यूव झाला असल्याचे सांगण्यात आले.
    संतोष लोखंडे याचा हाकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मयत संतोष लोखंडे याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पॉलिसांमार्फत देण्यात असून पुढील तपास ग्रामीण पोलस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.