‘या’ गोष्टीचा पुजाला होता ताण ; वडिलांनी केला धक्कादायक खुलासा…

पूजा आमचा मुलगा होता. सहामुली पैकी एक असलेल्या पुजाला पाच बहिणी आतापर्यंत राखी बांधायच्या, मात्र आम्ही आमचा मुलगा गेला. वडिलांसाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र आमचा आधारच निघून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे

    बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पूजाच्या निधनानंतर पहिल्यांदाच तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. मात्र तो खूप तोट्यात आहे. कदाचित पूजाला त्या गोष्टीचा ताण असावा, पोल्ट्री उभी करण्यासाठी आम्ही पूजाच्या नावे कर्ज घेतले होते. मात्र हा व्यवसाय सुरुवातीपासूनच तोट्यात गेला. पूजाच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही. आणि कुणाला दोषही द्यायचा नसल्याचे’, मत पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

    ‘त्यामुळे माध्यमांमधून होणारी आमची बदनामी बंद करून टाका. जे सत्य समोर याचे ते येईल, या सगळ्याचा आम्हाला जास्त त्रास होत आहे. पूजा आमचा मुलगा होता. सहामुली पैकी एक असलेल्या पुजाला पाच बहिणी आतापर्यंत राखी बांधायच्या, मात्र आम्ही आमचा मुलगा गेला. वडिलांसाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र आमचा आधारच निघून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पूजाच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. इतकच नव्हे तर संबंधित घटनेनंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांनी यात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.