बीड मध्ये हजारो मराठा बांधव उतरले रस्त्यावर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा….

आमदार विनायक मेटे याच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन आज बीडच्या छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाज एकवटला आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धडकला आहे. कोरोनाचे सावट अध्यप कामी झाले नसले तरी सुद्धा बीड मध्ये मोठ्या प्रमानावर मराठा समाज एकवटलेले दिसून आला.

    बीड : शिवसंग्रामचे संस्थसपक अध्यक्ष आमदार विनायक मेटे याच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन आज बीडच्या छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाज एकवटला आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धडकला आहे. कोरोनाचे सावट अध्यप कामी झाले नसले तरी सुद्धा बीड मध्ये मोठ्या प्रमानावर मराठा समाज एकवटलेले दिसून आला. या मोर्चात महिलांनी ही आपली उपस्थिती लावल्याचेही पहावयास मिळाली. या मोर्चात आमदार विनायक मेटे,माजी आमदार नरेंद्र पाटील, राजन पाटील,रमेश पोकळे, सह अनेक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपसातील मतभेद विसरुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने एकवटलेले दिसून आले.

    दरम्यान या प्रसंगी बोलतांना माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणले की, मराठा समाजाला अर्थीक निकषांवर आरक्षण मिळाले पाहिजेत या साठी आम्ही पुन्हा मैदानात उतरलो आहोत. सामजिक चळवळीतील माणसे मागास्वर्गीय आयोगात घेण्यात यावेत असेही त्यांनी मागणी केली आहे.

    या प्रसंगी बोलतांना आमदार विनायक मेटे म्हणले की, हा छत्रपतींचा मावळा उगाच कोणाच्या अंगावर येत नाही पण जर कोणी अंगावर आले तर त्याला सोडत नाही, पण हे सरकार अंगावर येत आहे. म्हणून हा मराठा माणूस रस्त्यावर उतरला आहे. उद्धवजी तुम्ही जर तात्काळ या कडे लक्ष दिले नाही तर तुमचे पुढील दिवस बरे नाहीत असे या प्रसंगी बोलतांना म्हणले.

    तसेचं पुढे बोलतांना मेटे म्हणाले की, ही लढाई गरिबांची आहे श्रीमंतांची नाही आणि हा गरीब आता रस्त्यात आला आहे आणि तुम्ही श्रीमंतांचे ऐकू नका … या ठिकाणी कोणी वाड्यावरील नाहीत गरीब आहेत आणि त्याचा आवाज आम्ही बनून रस्त्यावर आलो आहोत. या सरकारला लाज वाटली पाहिजे कारण तुम्ही मराठा समाजाला दुर्लक्षित करत आहोत. अशोक चव्हाण सारखा नालायक आणि नाकर्ता माणूस दुसरा कोणीच नाही अशी झणझणीत टीका विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण वर केली. या अशोक चव्हाणच करायचे काय खाली मुंडके वरी पाय अशी घोषणा बाजी ही केली. जोपर्यंत अशोक चव्हाण राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठरवणार ओहत असे ही विनायक मेटे म्हणाले. पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करा अशी दुसरी मागणी या प्रसंगी बोलतांना केली.

    दरम्यान येत्या 5 जुलै पर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पावसाळी अधिवेशन आम्ही होऊ देणार नाही अशी चेतावणी ही या माध्यमातुन विनायक मेटे यांनी या सरकारला दिली आहे. या सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका उद्धवजी असे ही ते म्हणले. या राज्यात जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील आणि जर सरकार मानले नाही तर मुंबईला मोठा मोर्चा होईल अशी सूचना ही या प्रसंगी बोलतांना विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.