कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने पकडली, तब्बल ‘इतक्या’ जनावरांची झाली सुटका

    बीड :  कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. या वाहनातील 49 गाय, वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे यांना गायी कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी मांजरसुंबा चौकात सापळा रचला. सोमवारी पहाटे खडकत ता.आष्टी येथून गायी व वासरे बीडमधील कत्तल खाण्यात दोन पिकअप व आयसर मधून घेऊन निघाले होते. सदर वाहन बीड पासून 20 किमी अंतरावर असणार्‍या मांजरसुंबा चौकात येताच पथक प्रमुख विलास हजारे व त्यांच्यासहकार्यांनी पकडले. त्यामध्ये गायी, वासरे व घोरे असे एकूण 49 जनावारे अढळून आली. त्या सर्व जनावरांची सुटका करण्यात आली असून आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.