इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं चूल मांडून केला स्वयंपाक…

पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं, चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आले. यावेळी 'मोदी सरकारचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय' यासह केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.

    बीड : पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं, चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘मोदी सरकारचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ यासह केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.

    यावेळी महिला, पुरुषांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव निळकंठ वडमारे यांनी दिला आहे.