चाचा-भतीचा फाईटचा विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला जबरदस्त झटका; १५० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रेवश

बीडमधील चाचा-भतीचा फाईटचा जबरदस्त झटका विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला बसला आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसंग्रामसाठी हा मोठा धक्का आहे.

    बीड : बीडमधील चाचा-भतीचा फाईटचा जबरदस्त झटका विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला बसला आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसंग्रामसाठी हा मोठा धक्का आहे.

    शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात सध्या काँटे की टक्कर सुरु आहे. यांच्या या राजकीय वादाचा फटका शिवसंग्रामला बसला आहे. शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडण्यात आ. संदीप क्षीरसागर यांना यश आले आहे.

    त्यांच्या या फोडाफोडीमुळे बीडमधील राजकीय वातारावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांनी पक्षवाढीसाठी थेट फोडाफोडीचे अस्त्र बाहेर काढले. शिवसंग्रामचा एक बडा नेता हाताशी लागल्यानंतर त्यांच्यासह १५० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.