19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा आरोप

बीडच्या धारूर शहराचे भाजपचे नगराध्यक्ष, डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं, राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची, असं कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत, जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    बीड : बीडच्या धारूर शहराचे भाजपचे नगराध्यक्ष, डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं, राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची, असं कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत, जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    दरम्यान यातील डॉक्टर हा स्त्री रोगतज्ज्ञ असून धारूर नगर पालिकेचा विद्यमान नगराध्यक्ष आहे. तर या विरोधात डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन कडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. या गुन्ह्या विरोधात असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून, व्यापारी असोसिएशनकडून देखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    डॉ स्वरूपसिंह हजारी वय 60 वर्ष असं आरोप झालेल्या नगराध्यक्षाचे नाव आहे. ते धारूर नगर पालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून तो धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. काल दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली होती. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून, सोनोग्राफी सेंटर मधेच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलल्याचा देखील आरोप आहे. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.