गावठी पिस्तुल बाळगणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

विना परवानगीचा गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍या एका 22 वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    बीड : विना परवानगीचा गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍या एका 22 वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रॉयल ज्यूस बार, अ‍ॅक्सीस बँकेसमोर अक्षय लाड नावाचा युवक उभा असून विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल स्वत:जवळ बाळगून दहशत पसरवत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांनी त्याठिकाणी आपली टीम पाठवत गावठी पिस्टलसह युवकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता अक्षय व्यंकट लाड (वय 20, रा. माळीवेस, कोतवाल गल्ली), असे पोलिसांना सांगितले.

    दरम्यान त्याच्याकडे गावठी पिस्टलसह मॅगझीनमध्ये एक जीवन राऊंड मिळून आला. या प्रकरणी तरुणावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पीएसआय दुल्लत यांनी केली.