विनायक मेटे यांचा मोर्चा वैयक्तिक, मराठा क्रांती मोर्चाचा काही संबंध नाही; मराठा समाजाची बीडमध्ये बैठक

येत्या पाच तारखेला मराठा नेते विनायक मेटे बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार आहेत. परंतु हा मोर्चा त्यांचा वैयक्तिक असल्याच यावेळी सांगण्यात आलंय. मेटे काढत असलेल्या मोर्चाचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय.

    बीड : येत्या 5 तारखेला मराठा नेते विनायक मेटे यांच्या पुढाकाराने बीड मध्ये पहिला मराठा समजाचा मोर्चा निघणार आहे. माञ त्यापूर्वीच विविध मराठा संघटनांत मोर्चा संदर्भात मतभेद समोर आले आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर बीडमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनेने एकत्र येत आज बैठक घेतली आहे. शासकीय विश्राम गृहात ही बैठक पार पडली असून या बैठकी मध्ये मराठा समाजाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

    दरम्यान आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजात सध्या रोष आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यानं ही लाट ओसरल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाईल असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलाय. येत्या पाच तारखेला मराठा नेते विनायक मेटे बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार आहेत. परंतु हा मोर्चा त्यांचा वैयक्तिक असल्याच यावेळी सांगण्यात आलंय. मेटे काढत असलेल्या मोर्चाचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय.

    त्यामुळे यानिमित्ताने मराठा समाजातील मतभेद दिसून आला. मेटे पक्ष संघटनेच्या नावाखाली मोर्चा काढतायत, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुढील दिशा ठरवली जाईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.