त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू; आशिष शेलारांनी घेतली मारहाण झालेल्या शेतकऱ्याची भेट

माजी मंत्री आशिष शेलार यांनी किनगाव येथे जाऊन जखमी मोतीराम चाळक या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे.

    बीड : बी-बियाणे खरेदीसाठी गेवराई शहरात आलेल्या एका शेतकऱ्यास लाॅकडाऊनचे नियम मोडल्याचं कारण सांगून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर आज भाजपाचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी किनगाव येथे जाऊन जखमी मोतीराम चाळक या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे.

    दरम्यान शेतकऱ्याना अशी अमानुष मारहाण करणं हे शोभनीय नसून अडचणीच्या काळामध्ये आम्ही सदैव शेतकऱ्यांसोबत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

    मारहाणीनंतर नागरिकांकडूनही संताप

    बी – बियाणे खरेदीसाठी बीडच्या गेवराई इथल्या बाजारपेठेत आलेल्या एका शेतकऱ्यास लॉकडाऊनचे कारण सांगत, गेवराई पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. यामध्ये शेतकरी मोतीराम चाळक हे जखमी झाले आहेत. सध्या शेतकरी खरिपाची तयारी करतोय, यासाठी बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी बीडमधील मोंढ्यात येत आहेत. तर जिल्हा प्रशासनाने देखील कृषी दुकानं खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना बियाणं खरेदीसाठी आलो असल्याचं सांगून देखील मोतीराम चाळक यांना ही बेदम मारहाण झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीनंतर नाकरिकांनी संताप व्यक्त केला आहे.