ज्यांना गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार; पवारांची पाटलांवर टीका

चर्चित “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याला शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं…

    बीड (Beed).  चर्चित “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याला शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेतेही आक्रमक झालेले दिसत आहे. याच प्रकरणावरून ‘पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. पाटलांच्या विधानाचा हवाला देत शरद पवार यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली.

    ठाकरे-फडणवीस आमनेसामने…
    पूजा चव्हा प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल, असं म्हटलं होतं. मागील काही दिवसात काहींना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सखोल चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असं ठाकरे म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकरणाचं गांभीर्य नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे कोण आयुष्यातून उठलं हे कळेल असा सल्ला फडणवीसांना दिला आहे.