प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात १० निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला – देवेंद्र फडणवीस

मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपयांचा मदत निधी देण्यात यावे आणि भंडारा सामान्य रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी राज्य सरकारने तत्काळ आराखड्याला मंजुरी द्यावी-

भंडारा: प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात १० निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला आहे, मात्र अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भंडारा बंद पाळण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपयांचा मदत निधी देण्यात यावे आणि भंडारा सामान्य रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी राज्य सरकारने तत्काळ आराखड्याला मंजुरी द्यावी, यासुद्धा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारने तत्काळ या तिन्ही मागण्या मान्य कराव्यात असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.