Ten infants die in fire at Bhandara District Hospital's child care unit Chief Minister Uddhav Thackeray's inquiry order

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत(bhandara fire case) १० नवजात बालकांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत(bhandara fire case) १० नवजात बालकांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने रुग्णालयातील रिक्त जागा भरणे, जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्युत अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता नियुक्ती आणि जिल्हा रुग्णालयांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षामध्ये लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या आगीच्या वेळी अग्निशमन दलाचे जवान, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक व टेलिफोन ऑपरेटर यांनी सात बालकांना तर वाचवलेच, शिवाय या शिशु कक्षाशेजारी असलेल्या अतिदक्षता विभाग व सिझेरियन विभागातील रुग्णांनाही अन्यत्र हलवल्याबद्दल विभागीय आयुक्तांच्या अहवालात कौतुक करण्यात आले आहे.