भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ४० केंद्रे ; २२ हजार जेष्ठ नागरिकांनी घेतली लस

भंडारा जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली असून यासाठी ४० केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणास जिल्ह्यात 16 जानेवारी पासून सुरुवात झाली.

    भंडारा (Bhandara).  जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली असून यासाठी ४० केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणास जिल्ह्यात 16 जानेवारी पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 42 हजार 116 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 1 मार्चपासून जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली असून 45 ते 60 वर्ष वयोगटातील 3 हजार 385 तर 60 वर्षावरील 18 हजार 715 असे एकूण 22 हजार 100 जेष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.

    कोविड 19 ची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरण केंद्रावर याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येते. लस घेतल्यानंतर थोडा ताप किंवा अंगदुखी सारखे वाटण्याची शक्यता आहे. अशावेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा सल्ला शासकीय रुग्णालयात अगदी मोफत देण्याची सोय उपलब्ध आहे.

    एक मार्चपासून लसीकरण सुरू झाले असून शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खासगी रुग्णालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. -- संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा