vijay wadettiwar

भंडारा. पूरपरिस्थितीमुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून भंडारा जिल्हयातील पूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर करण्यात आले आहे. नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला असून अशाप्रकारे पूरग्रस्तांना भरीव मदत करून मदत ब पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी वचनपूर्ती केली आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पातीळ सर्व दरवाज्यांमधून ५ मीटरपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ साली ओढवलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

या दाहक व भीषण  परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. या चारही जिल्हयातील पूरग्रस्त भागाची ‘पाहणी करताना वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे

आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे व अजित पवार यांच्याशी दूरध्वनीव्दारे चर्चा करून पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती.या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला.