रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा ठरतोय जीवघेणा; वरठी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

हनुमान वार्ड येथील रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला असून यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहे. शहरातील हनुमान वॉर्डात येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.

    वरठी (Varathi).  हनुमान वार्ड येथील रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला असून यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहे. शहरातील हनुमान वॉर्डात येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. यात रस्त्याला भेदून जाणाऱ्या नालीवर रपट्याचे बांधकाम करण्यात आले.

    मात्र खराब बांधकामामुळे काही दिवसातच या नालीवरील रपटा खचून रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा जीवघेणा असून दुचाकीने प्रवास करताना अचानकपणे समोर हा खड्डा आल्याने अनेक अपघात झालेले आहेत. मात्र याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यच्या मधोमध मोठा खड्डा पडला असतानाही कोणत्याही प्रकारची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीने नागरिकांच्या जिवाशी खेळ न करता दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.