रासायनिक फवारणीमुळे पिकांवर दुष्परिणाम; पीक घेण्याच्या पध्दतीत बदल गरजेचे

पिकावरील रोगराईचा नाश व भरघोष उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकांचा वापर मोठ‌या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे.

    भंडारा (Bhandara).  पिकावरील रोगराईचा नाश व भरघोष उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकांचा वापर मोठ‌या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणात औषधांचा वापर करावा, तसेच पीक घेण्याच्या पध्दतीत बदल करावा अशी मागणी प्रगतीशील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

    अनेक शेतकरी शेतात आधुनिक पध्दतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल. मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरश विषाची फवारणी केलीजात आहे. त्यामुळे मात्र वर्षानुवर्षे आजोबा, पंजोबापासून कसत असलेल्या जमिनीची परंपरा आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक घेण्याच्या पध्दतीत बदल करावा, असेही मत व्यक्त केले जात आहे.

    आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सेंद्रीय शेतीउत्तम असल्याचे याचा प्रसार व प्रसार कृषी विभागाकडून केला जात आहे. मात्र शेतकरी याचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांची कार्यशाळा व त्यांना शेतीशी निगडीत माहिती सोबतच पिकांची लागवड करताना घ्यावयाची काळजी आदिबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मात्र शेकडो शेतकरी या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवित नसल्याचे चित्र आहे.

    शेतकऱ्यांनी भरघोष उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी पीक घेण्याच्या पध्दतीत बदल करावा, सोबतच किडीवर फवारणी प्रमाणता करावी, असेही मत सुज्ञ शेतकऱ्याकडून व्यक्त केला जात आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होत असल्याचे लक्षात घेत शेतकऱ्यांनी जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.