महालगावातील डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे; चौकशीची मागणी

रस्त्याची कामे खडीकरण न करता काळा ऑइल टाकून डांबरीकरण करण्यात आले. यामुळे जागोजागी हे डांबरीकरण उखळून रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग यांना दिले आहे.

    महालगाव (Mahalgaon).  रस्त्याची कामे खडीकरण न करता काळा ऑइल टाकून डांबरीकरण करण्यात आले. यामुळे जागोजागी हे डांबरीकरण उखळून रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग यांना दिले आहे.

    लेखाशिर्ष 5054 व 3054 अंतर्गत येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला देण्यात आली. सदर कंत्राटदार हा जिल्ह्यातील एका नेत्याचे नाव समोर करून ही कंत्राट मिळवून बोगस कामे करीत असल्याचा आरोप आहे. पळसगाव ते पवारटोली, महालगाव ते परसोडी, चारगव ते सुंदर, एकोडी ते किन्ही. वडदटोली ते वडद, ठिवरी पांदन ते सुकळी, बाम्हणी ते मुंडीपार या रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत.

    रस्ता तयार करताना अगोदर रस्त्याचे खडीकरण आवश्यक असते. त्यानंतर त्यावर डांबरीकरण करण्यात येते. डांबरीकरण करतानाही त्यावर काळा ऑइल पसरविले आहे. त्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडलेला आहे. सदर रस्त्याची बांधकामावर कोट‌यावधी रुपयाचा निधी खर्च होऊनही बोगस पध्दतीने करण्यात आले आहे. या कामाची तक्रार नागपूर येथील क्वालीटी कंट्रोरलला करण्यात आली.

    मात्र अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. कंत्राटदाराचे देयक देण्याआधी कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवदेन देताना महालगावचे ग्रा.पं. सदस्य सुरेश कावळे, माजी उपसरपंच गिरिधारी खरकाटे, ग्रा.पं. सदस्य दिनेश तरोने व गाववासी उपस्थित होते.