मोठी बातमी! संपूर्ण राज्यामध्ये कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज

संपूर्ण राज्यामध्ये कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांतून ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

    भंडारा: संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तसेच देशात आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचं संकट देखील घोंघावत आहे. परंतु आता एक दिलासादायक बातमी म्हणजे महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला असून शेवटच्या कोरोना रूग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे.

    कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा

    संपूर्ण राज्यामध्ये कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांतून ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच १९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून ६२ टक्के होता. आता हा रिकव्हरी रेट वाढून ९८.११ टक्के एवढा झाला आहे.

    कधी सापडला होता पहिला रूग्ण

    भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी २७ एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५७८ जणांचा अहवाल तपासण्यात आला असून यामध्ये एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.