Boyfriend at home, husband at door; Holding clothes in her hands, her boyfriend jumped from the balcony and ...

मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला जाण्याचे थ्रील एका पोलिस शिपायाच्या जीवावर बेतले आहे. भंडारा येथे ही घटना घडली आहे. अचानक विवाहीत प्रेयसीचा पती आल्याने बॉयफ्रेंडने बाल्कनीतून उडी मारली. यावेळी थेट रस्त्यावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या भंडारा पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

भंडारा : मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला जाण्याचे थ्रील एका पोलिस शिपायाच्या जीवावर बेतले आहे. भंडारा येथे ही घटना घडली आहे. अचानक विवाहीत प्रेयसीचा पती आल्याने बॉयफ्रेंडने बाल्कनीतून उडी मारली. यावेळी थेट रस्त्यावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या भंडारा पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

महेश वसंतराव डोंगरवार (३६) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. रविवार मध्यरात्री पोलीस शिपाई महेश डोगरवार विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता.

हे दोघे बेडरूममध्ये असताना प्रेयसाच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता.

तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.