मुख्यमंत्री ठाकरेंची आज भंडारा भेट, मृत मुलांच्या नातेवाईकांची करणार विचारपूस

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किट होऊ लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना आपले प्राण गमावावे लागले. नुकत्याच जन्म झालेल्या कोवळ्या जीवांना अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागणं, ही काळीज पिळवटून टाकणारी घटना होती. केवळ या मुलांचे आईवडिल आणि नातेवाईकच नव्हे, संपूर्ण महराष्ट्र या घटनेने सुन्न झाला. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) घटनास्थळी भेट देणार आहेत.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडाऱ्याला भेट देणार असून मृत मुलांच्या नातेवाईकांची ते विचारपूस करतील.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किट होऊ लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना आपले प्राण गमावावे लागले. नुकत्याच जन्म झालेल्या कोवळ्या जीवांना अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागणं, ही काळीज पिळवटून टाकणारी घटना होती. केवळ या मुलांचे आईवडिल आणि नातेवाईकच नव्हे, संपूर्ण महराष्ट्र या घटनेने सुन्न झाला. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) घटनास्थळी भेट देणार आहेत.

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन या घटनेतील बळींच्या नातेवाईकांच्या पाठिशी असल्याचं याअगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मुख्ममंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. या घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर या दुर्घटनेचं नेमकं कारण तपशीलवार कळू शकेल.

शनिवारच्या घटनेमुळे भंडाऱ्यातील वातावरण सध्या संवेदनशील आहे. मुख्यमंत्री घटनेतील बळींच्या नातेवाईकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.