प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संकटामुळे यावर्षी एक तर शाळाच भरल्या नाही. दुसरे म्हणजे शेकडो मुले शाळांमध्ये दाखलच झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव असल्यामुळे ही शोधमोहीम राबवताना अनेक अडचणी येत आहे.

    पवनी (Pawani). कोरोना संकटामुळे यावर्षी एक तर शाळाच भरल्या नाही. दुसरे म्हणजे शेकडो मुले शाळांमध्ये दाखलच झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव असल्यामुळे ही शोधमोहीम राबवताना अनेक अडचणी येत आहे.

    जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा वेळी शिक्षकांना शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी दारोदारी फिरण्याचे आदेश मिळाले आहेत. यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी निमंत्रण मिळणार नाही का,  असा सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहे. मग शाळाबाह्य मुले शोधून त्यांना दाखल कुठे करणार, कोण शिकवणार याची उत्तरे शिक्षण विभागाकडे नाहीत.

    शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे एक-एक पथक नेमण्यात आले आहे. मात्र एकाच गावात विविध परिसरासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने यावेळी पहिल्यांदाच शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य, विभाग ते जिल्हा व तालुका पातळीपर्यंत नियंत्रण समित्या गठित करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष खुद्द जिल्हाधिकारी असून या मोहिमेसाठी शिक्षकांसोबतच महसूल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही पथकात समावेश करण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यात शिक्षकांव्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे कर्मचारी या मोहिमेत अजून तरी सहभागी झालेले नाहीत.