corona

शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे हे ठरवून दिले असताना देखील शहरातील एटीएमवर कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भंडारा. शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे हे ठरवून दिले असताना देखील शहरातील एटीएमवर कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक व अन्य शहरातील अन्य भागात वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे एटीएम आहेत. शहरातील कोणत्याच एटीएम केंद्रावर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. कोरोना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहेत.

परंतु बँक प्रशासनाकडून याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरात विविध व्यापारी, नागरिक, कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. तसेच सतत पैसे काढण्यासाठी एटीएमवर गर्दी असते. कोणत्याच एटीएम केंद्रावर नियमांचे पालन होत नाही. बँक प्रशासनाने एटीएमवर सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे. तसच शहरातील राष्ट्रीय बँकामार्फत चालणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रावर आधार प्रमाणी करणाने पैसे काढण्यासाठी गर्दी होते. या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एटीएम केंद्र व ग्राहक सेवा केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करत नसल्याचे दिसत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.