शेती करणे शेतकऱ्यांना झाले डोईजड; महागाईत वाढ पण उत्पन्नात घट

अवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी, रोगराईमुळे नापिकीचे संकट असतानाच सातत्याने वाढणारी महागाई तुलनेत उत्त्पनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे डोईजड ठरत आहे.

    भंडारा (Bhandara).  अवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी, रोगराईमुळे नापिकीचे संकट असतानाच सातत्याने वाढणारी महागाई तुलनेत उत्त्पनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे डोईजड ठरत आहे.

    खरीप हंगामातील शेतमाल विकून गोळाबेरीज केली जाते. तसेच रबी हंगामातील शेतमालाच्या संभाव्य उत्पन्नाचा अंदाज शेतकरी बांधतो. त्यावर सारे नियोजन केले जाते. दरवर्षी सालकऱ्याचा खर्च, बी-बियाणे खरेदी, कृषी केंद्राची थकबाकी अदा करणे, शेतांची मशागत रासायनिक व जैविक खते कीटकनाशके व मजुरांसाठी लागणारा पैसा याचेसुद्धा नियोजन कसे करावे? याचा अंदाज बांधल्या जातो. खताच्या, अवजारांच्या किमंती वाढल्या. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.