इंदूरखा येथील विद्युत पंप नादुरुस्त; पाणीपुरवठा योजना बंद

मोहाडी तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या इंदूरखा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पंपामध्ये बिघाड आल्याने व पंप दुरुस्त करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

    मोहाडी (Mohadi).  तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या इंदूरखा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पंपामध्ये बिघाड आल्याने व पंप दुरुस्त करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

    सध्या उन्हाळा तापत आहे. ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांसोबत जनावरांची संख्या तसेच नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे घराघरात भरपूर पाण्याची गरज असते. अशातच गेली 7 दिवस लोटून गेली मात्र पाण्याच्या विहीरीवर लावलेली विद्युत मोटर पंप दुरुस्त झालेली नाही. त्यामुळे घरगुती नळाने गावातील पाणी पुरवठा पूर्णत: बंद झालेला आहे. विद्युत पंप तात्काळ दुरुस्त करून गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच संबंधित पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायतनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक घरातील कुटुंबांना व जनावारांसाठी पाण्याची नितांत गरज आहे.

    इंदुरखा गावातील जनता सध्या सात दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त झालेली आहे. घरघुती पाणी वापरासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे. या समस्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष न करता तात्काळ विद्युत पंप दुरुस्त करून घरघुती पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केलेली आहे. यासाठी गावकरी नागरिक सहकार्य करण्यास तयार आहेत.