
भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास आणून देवू अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मुंबई : भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास आणून देवू अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीतप्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि कमिशनर यांच्यापर्यंत आलेला नाही मात्र तो आज येईल अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईलच यात शंका नाही मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरअॉल प्रयत्नशील राहू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.