
त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केले तरीही ते परत आणता येणार नाहीत. दुर्घटनेनंतर जे होते, ते आधी का होत नाही असा प्रश्न आता विचारला आहे. कोरोना संकट असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचीही चौकशी केली जाईल- उद्धव ठाकरे
भंडारा: ‘या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, इतकं हे प्रचंड दुःख आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांजवळ व्यक्त केल्या आहेत. भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी त्यांनी केली. या घटनेची चौकशी करण्यात येईल. कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सांगितले .
‘दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांना भेटलो. त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केले तरीही ते परत आणता येणार नाहीत. दुर्घटनेनंतर जे होते, ते आधी का होत नाही असा प्रश्न आता विचारला आहे. कोरोना संकट असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचीही चौकशी केली जाईल. हा प्रकार अचानक घडला की वारंवार तक्रारी येत असतानाही अनास्थेमुळे हा प्रकार घडला, त्याचीही चौकशी होईल,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.