अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धान पोती उघड्यावर; गोडाऊनची निर्मिती वाऱ्यावर

सिहोरा-बपेरा परिसरात गोडाऊनच्या अभावाने धानपोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानाचे नुकसान झाले होते. आता कडक उन्हासह उंदीर, घुशीमुळे धानाची प्रतवारी खराब होत आहे.

    सिहोरा (Sihora).  सिहोरा-बपेरा परिसरात गोडाऊनच्या अभावाने धानपोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानाचे नुकसान झाले होते. आता कडक उन्हासह उंदीर, घुशीमुळे धानाची प्रतवारी खराब होत आहे.

    सिहोरा-बपेरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकांचे उत्पादन वाढले आहे. परंतु, आधारभूत केंद्रावर धान ठेवण्यासाठी जागा नाही. अल्पावधीतच गोदामे तुडुंब भरतात. त्यामुळे अनेकदा खरेदी थांबविली जाते. मालाची उचल केली जात नाही. नव्या गोदामांचे बांधकाम करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. उघड्यावर असलेल्या धानपोत्याची जनावरे नासधूस करीत आहेत. कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी गोडाऊन निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे.