tuar dal price

  • tuar dal price

भंडारा. कोरोना विषाणूच्या( Corona period) वाढत्या प्रकोपामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दरम्यान सर्वसामान्यांना महागाईचाही फटका ( Inflation erupted) बसत आहे. आधीच गरिबांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यातच जीवनावश्यक वास्तूंमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. खाद्यतेलाच्या भावात भडका उडाला आहे. तूरडाळीचे दरही वधारले आहेत. कोरोनाशी लढता लढता  आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत. पेट्रोल- डिझेलप्रमाणेच भाजीपाला व बटाटा-कांदा, टमाटरच्या वाढत्या किमतीमुळेही चिंता वाढली आहे. आता किरकोळमध्ये तूरडाळ (Tur dal) ९८ रुपये प्रतिकिळोवर पोहोचून लोकांना महागाईचा झटका देण्याचे काम सरकार करीत आहे. डाळीच्या वाढत्या किमतीमुळे आता गरिबांना डाळ खरेदी करावी की नाही, असा प्रश्‍न पडला आहे.गरिबांचे कंबरडे मोडले

कोरोना संकटकाळात वाढत्या महागाईमुळे भाज्यानंतर आता गरिबांचा एकमात्र आधार डाळी त्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे . ठोकसोबतच किरकोळमध्येही आता डाळ महाग विकल्या जात आहे . तूरडाळ १०० रुपयाच्या जवळपास पोहोचल्यामुळे गरिबांना डाळ खरेदी करणेही कठीण झाले आहे. धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक भाव देण्याच्या विचारात सरकारने मिलर्सना आयात परवाना जारी केलेला नाही. डाळीच्या भावात वाढ होत आहे . काही दिवसात तूरडाळ १०० रुपयाच्या वर पोहोचेल. या डाळींप्रमाणेच आता हरभराडाळही ठोकमध्ये  ६० ते ७० रुपये आणि किरकोळमध्ये ६५ ते ७५ रुपये प्रतिकिलोवर सुरू आहे. तसेच लोकांना मूगडाळीची खिचडी खाणेही महागात पडत आहे. मूगडाळही तूर डाळीप्रमाणेच किरकोळमध्ये ९० ते ९५ रुपये प्रतिकिलो आणि ठोकमध्ये ८० ते ९० रुपये प्रतिकिलो सुरू आहे . वाटाणाही हरभऱ्यास मागे टाकत आहे. सरकारने वाटाण्यात १०० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे याचे भाव आकाशाला भिडत आहेत. सध्या आयातीत वाटाणा ठोकमध्ये ६० रुपये प्रतिकिलो सुरू आहे. तर गावरानी ५५ ते ५७ रुपये प्रति किलो सुरु आहे.

 

नवीन उत्पादनासाठी तीन महिने प्रतीक्षा

कोरोनामुळे सध्या अधिकतर लोकांजवळ कमाईचे कुठलेही साधन नाही. अशातच प्रत्येक डाळीचे भाव महाग होऊन आवाक्याबाहेर होत आहेत. आता तुरीचे नवीन उत्पादन येण्यास ३ महिने वेळ आहे. अशातच सरकारने सर्वसामान्यांचा विचार करायला हवा. सरकारने वेळेवर आपला निर्णय घ्यावा. नाफेडजवळ जो तुरीचा स्टॉक आहे. तो बाजारात विकून तूर डाळीच्या वाढत्या भावावर विराम लावावा. सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा स्थिती अधिकच बिकट होईल.