korona death

टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण तंतोतंत खरी करणारी घटना गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव येथे समोर आली आहे. कोरोना ग्रस्त महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंगावरचे दागिने लंपास केल्याची घटना येथे उघड झाली आहे. कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही काही जण इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात ही एक शोकांकित आहे.

मोरगाव/ अर्जुनी. तालुका मुख्यालयातील मोरगाव येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूपश्चात अंगावरील सोन्याचे दागिने परत करण्यात आले नाही. ते परत करा, अशी आर्तहाक बाधित महिलेच्या पतीने जिल्हाधिकार्‍यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मोरगाव येथील गरोदर महिला १५ ऑक्टोबर रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. तिच्या शरीरात रक्‍ताचे प्रमाण कमी होते.

त्या महिलेची कोरोना रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आली. तिला पुढील उपचारासाठी गोंदियाला रेफर करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ती मृत महिला कोरोनाबाधित असल्याची खात्री झाल्याने प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली. डॉक्टरांनी नगरपंचायत प्रशासनाळा कळविले. तीन कर्मचारी आले व त्यांनी मृतदेह ‘पॉलिथिनमध्ये गुंडाळले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक तलावात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मृताचे पती व नातेवाईक सुद्धा उपस्थित होते. काही दिवसांनी मृत महिलेच्या पतीला दागिन्यांची आठवण झाली. त्यांनी गुरुवारी दागिन्यांविषयी नगरपंचायतीमध्ये चौकशी केली. त्यांनी नकार दर्शवत ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता तो मृतदेह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ‘पॉलिथिनमध्ये गुंडाळल्याचे सांगून परत पाठविले. आता माझ्या पत्नीच्या मृतदेहावरी चार ग्राम सोन्याचे मंगळसूत्र गेळे कुठे ? अशी तक्रार मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे केली आहे.